टॉप बातम्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मादगी समाज संघटना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा विचार मंच, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १ ऑगस्ट) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील कल्याण मंडपम वणी येथे भव्य जयंती अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. समाजप्रबोधन, साहित्य आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
     
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजयभाऊ देरकर होते, तर उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, नगराध्यक्ष विद्या आत्राम, नगरसेवक अनिकेत बदखल, करुणा कांबळे, ऋतिक मामीडवार तसेच मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष नथ्युजी नगराळे, हिरेश पोटफोडे अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा विचार मंच यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. समाज हितासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना हिरेश पोटफोडे यांनी केली. सूत्रसंचालन प्रकाश तालावार सर यांनी प्रभावीपणे केले, तर नागेश मोहुर्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश खडसे, महादेव जाधव, नरेश ससाणे, अमोल बावणे, सचिन ठोंबरे, सागर डोंगरे, रतन खडसे, अशोक पोटफोडे, सुरज चाटे, राकेश शंकावार, निलेश परगंटीवार, रवी कोमलवार, नागेश मोहुर्ले, किशोर मंथनवार, रितिक बेलेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पहिल्यांदाच निघाली भव्य प्रतिकृती रथ मिरवणूक...
     कार्यक्रमानंतर ढोल-ताशांच्या गजरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य प्रतिकृती रथाची मिरवणूक संपूर्ण वणी शहरातून काढण्यात आली. मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह हजारो समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील विविध चौकांमध्ये थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.विशेष म्हणजे, वणी शहरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य प्रतिकृती रथ मिरवणूक काढण्यात आल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरला. समाजाच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि अण्णाभाऊंच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();