टॉप बातम्या

आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर आता निर्णायक लढा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरीजामणी : आदिवासी टायगर सेनेची तालुकास्तरीय पदाधिकारी आढावा बैठक आज झरीजामणी येथील विश्रामगृहात उत्साहात पार पडली. बैठकीत झरीजामणी तालुक्यातील आदिवासी समाजाचे वनहक्क, महसूल, शिक्षण, रोजगार, शासकीय योजनांचा लाभ, जात पडताळणी, मूलभूत सुविधा आदी अनेक प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आदिवासी टायगर सेना तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पवन कुळसंगे यांनी, "आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही संघर्ष करण्यात येईल," असे ठाम मत व्यक्त केले.

बैठकीस तालुका उपाध्यक्ष प्रेमप्रताप सिडाम, तालुका संघटक बापूराव टेकाम, युवा तालुका उपाध्यक्ष मारोती मेश्राम, तालुका उपसंघटक नितीनभाऊ आत्राम, युवा तालुका संघटक मनोजभाऊ आडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख अमोल मेश्राम, तालुका कार्याध्यक्ष महादेव आत्राम, युवा तालुका उपसंघटक मिथुन सोयाम तसेच योगेशभाऊ मडावी, रवीभाऊ कुमरे, कृष्णा टेकाम, अश्विन आत्राम, आकाश आत्राम सर, विक्रम सुरपम, मधुकर टेकाम, तोडसाम सर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();