सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नोबेल पारितोषिक विजेते आणि “गीतांजली”कार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती वणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील टागोर चौक येथे असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी हारार्पण करून अभिवादन केले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अभावाने आढळणाऱ्या गुरुदेव टागोर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांपैकी वणी येथील पुतळा ऐतिहासिक मानला जातो. सुमारे शंभर वर्षांपूर्वी श्री गणेश विद्यार्थी मंडळाने हा पुतळा उभारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाल्याची नोंद आहे.
यावेळी परशुराम पोटे, सुनील इंदुवामन ठाकरे, आसिफ शेख, राजू धावंजेवार, ज्ञानेश्वर बोनगिरवार, पांडुरंग लांजेवार, आकाश डुबे, महादेव दोडके आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी गुरुदेव टागोर यांच्या साहित्य, कला आणि सामाजिक विचारांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.