सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : खासदार संजय देशमुख यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी मारेगाव येथे मोफत विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय बसविणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे व तत्काळ वितरण करण्यात येणार आहे.
हे शिबिर दि. 20 मे 2026 रोजी मारेगाव येथील एकविरा बँक परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुक्यातील गरजू दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे :•आधार कार्ड•रेशन कार्ड•स्वतःचा फोटो•वैद्यकीय प्रमाणपत्र (UDID कार्ड आवश्यक)किमान 40 टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी सेनेचे पुरुषोत्तम बुटे,अभय चौधरी,अमोल झोटिंग यांना संपर्क साधावा.