सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शेतकरी व कामगार नेते तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 23 मे 2026 रोजी दिवसभर विविध कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराने होणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात गरजू ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
सायंकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या नवीन व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, हा कार्यक्रम शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिवसेनामंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत.
समाजसेवेच्या माध्यमातून विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, नागरिक, रक्तदाते, समाजसेवक आणि शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय खाडे फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था आणि संजय खाडे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.