सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दि. 20 मे 2026 रोजी यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. संजय देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मारेगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथील शासकीय रुग्णालय, मारेगाव येथे उत्साहात पार पडले.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये मारेगाव तालुक्यातील तब्बल 16 दिव्यांग लाभार्थ्यांनी सहभाग घेत विविध कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्यांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या शिबिरासाठी मुंबई येथून तज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी लाभार्थ्यांची तपासणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुटे, डॉ. इंगळे, डॉ. मनिष मस्की, शिवसेनेचे बद्रुद्दीन काजी, सौ.इंदूताई किन्हेकार, विशाल परचाके, डॉ. सपना केलोडे, देवा बोबडे, दुमदेव बेलेकर, अमोल झोटिंग, सुनील सोमलकर, दिवाकर सातपुते, गोवर्धन टोंगे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी परिश्रम घेत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
