टॉप बातम्या

वणीतील लेखकाच्या कार्याची संतभूमीत दखल व सत्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : संत व संत साहित्यावर नियमित लेखन करणारे सुनील इंदुवामन ठाकरे यांचा गोपाळपुरच्या मंदिरात सत्कार झाला. पंढरपूर जवळील हे मंदिर ‘जनाबाईंचा संसार’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथंच संत काशीबा गुरव महाराजांची समाधी आहे. 

संत काशीबा महाराजांनी समकालीन संत सावता महाराजांचे अभंग लिहून काढलेत. यांच्यावर संशोधन करायला सुनील इंदुवामन ठाकरे काही दिवस पंढपुरात होते. गोपाळपुरच्या संत काशीबा महाराज समाधी मंदिराला त्यांनी भेट दिली. संत जनाबाई आणि कृष्ण मंदिरातच ती समाधी आहे. संस्थानाचे अध्यक्ष दिलीपभाऊ भोसले आणि काशीबा महाराज मठाचे ह.भ.प. माउली महाराज गुरव ह्यांनी त्यांचा सत्कार केला. सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी यापूर्वी संत काशीबा महाराजांवर रिंगण्याच्या विशेषांकात लेखन केलं होतं. समाधी सापड्यावर नव्या माहितीत भर पडली आहे. त्या पुढील संशोधनाची जबाबदारी रिंगणचे संपादक सचिन परब यांनी ठाकरेंना दिली. आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात या विशेषांकाचे प्रकाशन होत आहे. 

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात रिंगण विशेषांक प्रकाशित होतो. संतश्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माउलींच्या समकालीन १३ संतांवर रिंगणचे १३ अंक आजवर प्रकाशित झालेत. संत कुर्मदास, जगमित्र नागा, जोगा परमानंद, कान्हो पाठक काशीबा गुरव यांसह अनेक संत आहेत. त्या सर्वांवर एक विशेषांक आषाढी एकादशीला यावर्षी प्रकाशित होत आहे. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();