टॉप बातम्या

भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणार आता अनुदान


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर आता राज्यातील 1800 भजनी मंडळांना मोठा फायदा होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25,000 रुपये भांडवली अनुदान देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार भजनी मंडळांना पहिल्यांदाच असं अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी तब्बल ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आज 23 ऑगस्ट 2025 पासून 06 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया असेल. या योजनेमुळे भजनी मंडळांना नवे व दर्जेदार भजन साहित्य खरेदी करता येईल आणि सांस्कृतिक परंपरेला नवा उत्साह मिळेल. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केलं आहे. 


ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम https://mahaanudan.org वेबसाईटवर भेट द्या.
• नोंदणी करा (प्रशासकीय विभाग-जिल्हा- तालुका- गाव/नगरपालिका निवडा).
• भजनी मंडळाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ईमेल नोंदवा.
• लॉगिन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. 


Previous Post Next Post