टॉप बातम्या

वणीमध्ये पोळा उत्साहात साजरा, वृषभ राजा व जगाच्या पोशिंद्या चा सन्मान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील शासकीय मैदानात भव्य पारंपारिक पद्धतीने पोळा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भजन, ढोलताशांचा गजर, आणि वृषभ राजाची भव्य मिरवणूक यामुळे संपूर्ण शहर दणाणून गेले होते. 

यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, विजय चोरडिया, राजाभाऊ पाथ्रडकर, नितीन शिरभाते, राजुभाऊ बिलोरीया, उमेश पोद्दार, प्रवीण पाठक, विनोद ढुमणे, अनिल महाराज रईस व शेतकरी तथा सालदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी सर्जाराजाची ओवाळणी करून त्यांचे मनोभावे पूजन केले व आशीर्वाद घेतला. त्यानंतर जगाच्या पोशिंद्याचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रथम श्रीकांत पोटदुखे यांची जोडी सह द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या जोडीचा झालेला विशेष मान हा कौतुकास्पद होता.

अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आनंद, उत्साह व कृषीसंस्कृतीचे महत्त्व या सोहळ्यात दिसत होती. पोळा सण हा शेतकरी व बैल यांच्यातील घट्ट नात्याचा आणि परिश्रमांचा उत्सव यातून कृतज्ञतेची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. 
Previous Post Next Post