Top News

शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी व अॕक्ट्रासिटी अॕक्ट कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जुन्नर येथील आढावा बैठकीत आमदार शरद सोनवणे यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदार सोनवणे यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ प्रदेश शाखा वणी तालुका पुष्पा आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात दि. 31 जुलैला मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविले आहे.

निवेदनात असंही म्हटलं की, प्रा. डॉ. अशोक उईके हे उच्च विद्याविभुषीत असून ते आदिवासी समाजाचे संपुर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अशा कर्तव्यदक्ष आदिवासी मंत्र्यांना खालच्या भाषेत केलेली जाहीर शिवीगाळ हा प्रकार आदिवासी मंत्र्यांचा अपमान नसून, सर्वहारा आदिवासी समाजाचा अपमान आहे. या अश्लाघ्य वक्तव्याचा अभा.आ.वि.परिषदच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे. त्यांचेवर अॅट्रासिटी अॅक्ट लावून गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे.

प्रा. डॉ. अशोक ऊईके मंत्री महोदय हे कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ते आदिवासी समाजाला आपल्या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांचे खच्चीकरण होतांना दिसत आहे. हे पुन्हा घडू द्यायचे नसल्यास अशी शिक्षा देणे आवश्यक आहे. असं निवेदनात म्हटलं.

निवेदनावर महिला अध्यक्ष विदर्भ प्रदेश पुष्पा आत्राम, संघटक विदर्भ प्रदेश पीडी आत्राम, उपाध्यक्ष नंदकुमार बोधकर, वणी तालुका अध्यक्ष अशोक नागभीडकर, सुधाकर आत्राम, चिंतामण आत्राम, देविदास चांदेकर, सुभाष आडे,शंकर किनाके, शरद बेसकर, भदू आत्राम, बाबाराव कुडमेथे, दौलत सिडाम, प्रभाकर किनाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post