Top News

अमोल कुमरे यांची 'आदिवासी टायगर सेना'च्या यवतमाळ जिल्हा महासचिवपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगती, आत्मसन्मान, अस्मिता, शिक्षण, संस्कृती, संवर्धन व संरक्षणासाठी काम काम करणाऱ्या कॅडर बेस संघटना, आदिवासी टायगर सेना यवतमाळ जिल्हा महासचिव पदी अमोल कुमरे ह्यांची नियुक्ती करण्यात आली.
         
जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आदिवासी टायगर सेना या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमोल कुमरे हे समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जात असून त्यांनी अनेक वर्षांपासून ग्रामीण व आदिवासी भागातील प्रश्न व हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी टायगर सेनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
      
 विदर्भ अध्यक्ष ॲड. संतोष कुळमेथे ह्यांनी विदर्भ संघटिका रंजना आत्राम, जिल्हा अध्यक्ष यवतमाळ बंडूजी तोडसाम व महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली केराम ह्याच्या मार्गदर्शनात नियुक्ती पत्र देऊन संघटना मध्ये जबाबदारी देण्यात आली. रमेश धुर्वे, अमोल गेडाम, संदीप टेकाम, संदीप कोवे, अशोका बुरडकर, अल्का गेडाम, मंगला चांदेकर, दीपा कोवे, रेखा सलाम, सह विदर्भातून शुभेच्छा चा वर्षाव होताना दिसते आहे.
      
अमोल कुमरे यांच्या नेतृत्वात आदिवासी टायगर सेना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कार्य करेल,” असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.


Previous Post Next Post