Top News

Accident : अठरा चक्की ट्रक 100 फूट खोल वर्धा नदीत आदळला...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक मन हेलावणारी घटना घडल्याचे समोर आले. चड्डा ट्रान्सपोर्टची 18 चक्क्याचा ट्रक (क्रमांक MH-34 BZ 1402) बेलोरा पुलावरून अनियंत्रण होऊन अंदाजे 100 फूट खाली वर्धा नदीच्या काठावर आदळला. या घटनेत ट्रक चालक कॅबिन मध्ये पूर्णतः फसल्याने गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक वेकोली नायगाव कोळसा खान येथे लोडींग करण्यासाठी जात होता. सकाळी अंदाजे 10.30 वाजता दरम्यान घुग्गुस नजीक वर्धा नदी बेलोरा पुल ओलांडताना वाहनाचे नियंत्रण अचानक सुटले आणि ट्रक रेलिंग तोडून सरळ नदीत खाली पडला.

या घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कटर च्या साहाय्याने ट्रक कॅबिन कापून ट्रक चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. वृत्तलिहेपर्यंत चालक गंभीर जखमी असल्याचे बोलल्या जात होत.

स्थानिक पोलीस प्रशासन घटनेच्या ठिकाणी पोहचून जमावाला क्लीअर करून गॅस कटर च्या मदतीने कार्य सुरु होते. सदर घटनेचे चित्र वेगाने सोशल मीडिया वर वायरल होत असून नदीत आदळलेल्या ट्रकची कंडिशन बघून सुन्न झाले. प्रत्यक्षदर्शीकडून या घटनेबाबत असं म्हटलं जात कि घटना इतकी अचानक झाली कि काही सुचेनासे झाले...
Previous Post Next Post