सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलिसांनी सतीघाट चिखलगाव रोडवर एका स्विफ्ट डिझायर गाडीतून अवैधपणे वाहतूक करत असलेल्या दारूसाठ्यासह दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस हवालदार नितीन गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, सतीघाट चिखलगाव रोडवर एक स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पदरित्या थांबलेली आहे. त्यामध्ये दोन इसम असून ते अवैध दारू वाहतूक करत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. त्यावेळी MH 49 B 5093 क्रमांकाची निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी मोक्षधाम चिखलगाव (सतीघाट) येथे रोडवर उभी असलेली दिसली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या मागील सीटवर आणि डिक्कीमध्ये २८ खोक्यांमध्ये एकूण २८०० नग ९० एम.एल. क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या (किंमत १ लाख १२ हजार रुपये) आढळून आल्या. तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी (किंमत ४ लाख रुपये) जप्त करण्यात आली. दिनांक २९/०७/२५ चे १२/०० वा सदरची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी खुशाल शंकर चहारे (वय ३७, रा. गुरूनगर, वणी) आणि शाम संभाजी दुर्ग (वय ३९, रा. दामले फैल, वणी) यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) आणि ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाईत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री गणेश किंद्रे यांचे मागदर्शनात प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन वणी स.पो.नी .प्रियंका चौधरी म्याडम यांचे आदेश्याने
पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम, पोलिस कॉन्स्टेबल
श्याम राठोड, पोलिस कॉन्स्टेबल गजानन कुडमेथे, पोलिस कॉन्स्टेबल शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम करत आहेत.