सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. हिवरा (मजरा) रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, आजारी महिला-पुरुष आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. वारंवार मागणी करून देखील लक्ष देत नसल्याने आज शनिवारी दुपारपासून नागरिकांनी भाजपचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वाखाली मंगेश देशपांडे, प्रशांत नांदे, पवन ढवस, प्रसाद ढवस, शेखर काळे, विजय खिरटकर, शंकर इनामे, उमेश मिल्मिले, विशाल गाडगे, शंकर रस्से, अजिंक्य काटवले, प्रकाश रस्से, दीपिका रस्से, अतुल खिरटकर, सरपंच सुरेश लांडे, उपसरपंच प्रशांत भंडारी, सरपंच रामचंद्र जवादे आदींसह शेतकरी बांधव आणि नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.