सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : मौजे कोडपाखिंडी येथील सातबारा अभिलेखाप्रमाणे गट न 11,49 सरकार पड जमीन असुन त्या जमिनीवर सन -2004 पूर्वी पासुन कोलाम समाजातील लोकांचा शेतीप्रयोजनसाठी कब्जा आहे. दरवर्षी प्रमाणे सन - 2025. च्या खरिप हंगामात शेतात अर्धपरिपक्व अवस्थेत पिकं उभे असताना पाटण बोरी वन परिक्षेत्र कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता जमीन कब्जात घेण्यासाठी दिनांक 23 जुलै रोजी वन कर्मचारी जीवन एरमे, चौकीदार दौलत पेंदोर शेतात आले असल्यामुळे शामादादा कोलाम ब्रिगेड चे सदस्य पोतू मडावी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवून कोलाम समाजाच्या कब्जात असलेली सरकार पड जमीन वन विभागाकडे वर्ग करु नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
कोडपाखिंडी येथील गट न 11,49, वर गजानन बारीकराव दाडांजे, पोतू रामा मडावी, सीताराम पोतु आत्रम,दशरथ भीमा कुमरे, मेसू भीमा आत्राम, अय्या कपलू टेकाम, मारोती भिमराव मडावी, मारोती लखामा अत्राम , लक्ष्मण पोतु मडावी,यांच्या कब्जात असलेली जमीन कोणत्याही प्रकारच्या सूचना न देता वन परिक्षेत्र कार्यालय पाटण बोरी यांनी जमीन वन विभागाकडे वर्ग करण्याची कारवाई करु नये अशी मागणी निवेदनातून केली.
जर तसे झाले तर शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांना सोबत घेवुन कोडपाखिंडी गावात आमरण उपोषण करण्याचा गर्भित इशारा निवेदनातून दिला यावेळी शामादादा कोलाम ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सरेश कुमरे उपस्थित होते