सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील काही शेतकरी हे शेतातील मालाला युरिया घेण्यासाठी बोथरा कृषी केन्द्रात गेले असता युरिया कृषी केन्द्रात उपलब्ध असताना दिला नसल्याने संतप्त शेतकऱ्यानी युरिया मिळावा यासाठी थेट कृषी केन्द्र चालकाची मारेगांव तहसिलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.
सध्याच्या काळात शेतकरी खरिप हंगामाच्या कामात व्यस्त असून कृषीमाल वाढीसाठी युरीयाची अत्यंत आवश्यकता आहे, त्या करिता मारेगांव येथील शेतकरी विलास रायपूरे गेल असता कृषी केंद्रात युरिया उपलब्ध असताना युरिया देण्यास मनाई केली, तुम्ही इतर बि-बियाणे व खते कुठून घेतली अशी चौकशी करून शेतकऱ्यांना चक्क वापस पाठविले.
शेतकऱ्याच्या भरवस्यावर मोठे होणारे कृषी केन्द्र चालक शेतकऱ्यांना जर असी वागणूक देत असेल तर, त्यांचे वर व कृषी केन्द्रावर वॉच ठेवणारे संबंधीत कृषी अधिकारी यांचेवर कारवाईची मागणी शेतकरी विलास रायपूरे व गजानन चंदनखेडे यांनी तहसिदाराना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लेखी तक्रारी आल्या तर कारवाई करू, कोणाचीही हयगय केल्या जाणार नाही.जो कायद्याच्या कचाट्यात सापडेल त्यांचेवर कारवाई केली जाणार.
-एस जे बुटले
प्रभारी तालुका कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक, मारेगाव