सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगावात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काही अतिक्रमण घरकुलधारकांनी दिनांक २५/०७/ २०२५ रोजी मारेगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आले,
निवेदनात असे नमूद आहे की,नगरविकास विभाग, शासन अधिसुचना क्र. एमसीओ - २०१८/ प्र.क्र. ३०९/ नवि - १४ - दि. १४- ०१- २०१९ नुसार शासकीय जागेवरील उदा. महसुल, नझुल व गावठानचे जागेवर मागील ४० वर्षापासून अतिक्रमण करून राहत आहे व त्यांना घरकुल सुद्धा मंजूर झाले असून नगरपंचायतने पहिला हफ्ता सुद्धा लाभार्थ्यांचे खात्यावर टाकला आहे. परंतू दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज केला असता सातबारा किंवा आखीव पत्रीका मागत असल्यामुळे घरकुलाचे बांधकाम अर्धवट राहून त्यांचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर आला आहे. शासनाचे प्रचलित जी आर (GR) नुसार अतिक्रमण धारक ज्या जागेवर राहत आहे व त्यांचेजवळ २०११ पुर्वीचा शासकीय (GOVT.) पुरावा आहे,अशा अतिक्रमण धारकांची ती जागा नियमानुकूल करुण द्यायचे नगरपंचायतने प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी वणी यांचेकडे पाठवायचे होते. परंतू पाठवीले नसल्यामुळे घरकुलधारक आज उघड्यावर राहत आहे. याबाबत शुक्रवारी नगरपंचायत कार्यालय मारेगांवचे मुख्याधिकारी बाबर यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी प्रशांत नांदे माजी उपाध्यक्ष न.प. मारेगांव, मिलींद राऊत, फैजान शेख, सौरभ पोटफोडे, रोहीत दिवेकर, आतीष राठोड, शुभम चौगूले, वैभव फुलकर, शेख सलीम, सलमान शेख, अविनाश राऊत, अविनाश जांभुळकर, प्रफुल आदे, मुकींदा पवार, दशरथ राऊत आदी अतिक्रमण धारक उपस्थित होते.