Top News

पोलिसांनी टिप्पर आणि त्यात असलेली वाळू केली जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला. यात अंदाजे सात ब्रास वाळू (गौण खनिज) आढळून आल्याने ही कारवाई रवी नगर, वणी येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्र पेट्रोलिंग वर असताना अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिपर ची चौकशी केली असता 7 ब्रास वाळू आढळून आली, यादरम्यान चालकांकडे वाळूची वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याने पोलीसांनी जप्तीची कारवाई केली.

टाटा टिप्पर क्र.एम एच 34 बी जी 1596 असा असून टिप्पर किंमत 25, 00,000/- आणि त्यात असलेली वाळू किंमत 420000 /- असा एकूण 25,42,000/- रुपये चा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला, पुढील तपास पोलीस करत आहे.

या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे. 
Previous Post Next Post