सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
सुहास ओचावार उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तत्काळ दखल घेवून ताबडतोब मुरुमाचे टीप्पर बोलावून खडडे बुजविन्यास सुरुवात केली. विशेष उल्लेखनीय असे की,मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अतिशय दयनीय अवस्थेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत, काही मंजूरात सुद्धा झाले, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने जनतेच्या मनात संताप खदखदत होता. त्यामुळे भाजपच्या वतीने संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी "भजन आंदोलन" करण्यात आले आहे.
भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचे नेतृत्वात आंदोलन यशस्वी करण्याकरीता प्रशांत नांदे, प्रसाद ढवस, मंगेश देशपांडे, रामचंद्र जवादे, विजय खिरटकर, शंकर रस्से, उमेश मिलमीले, शेखर काळे, पवन ढवस, प्रसाद झाडे, विशाल गाडगे, अतुल खिरटकर, अजिंक्य काटवले, प्रसाद झाडे, दीपिका रस्से यांसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.