Top News

संजय खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन


श्री संजय रामचंद्र खाडे...संघटन कौशल्य, धडाडीचे नेतृत्व आणि निष्ठा हे त्यांचे गुणविशेष सुपरिचित आहेत. ते जिल्हा कमिटीचे जिल्हा सरचिटणीस आणि आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्त झाले आहेत.


मा श्री संजय खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता अशी ओळख असणारे काँग्रेसशी एकनिष्ठ होते. तेव्हापासूनच तळागाळापर्यंत पोहोच असणारे, साधेपणा जपणारे, निष्ठावंत आणि प्रामाणिक नेते संजय खाडे यांना कार्यकर्त्यांची उत्तम साथ लाभत आली आहे. लोकसंग्रह जपण्याचा गुण त्यांनी आपल्या आचरणातही आणला आहे.

श्री. संजय खाडे हे पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे सोडविण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांना जनतेचा नेता मानले जाते. भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना ते निराश करत नाहीत. तळागाळातील समाजातील सर्वात गरजू आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून काम करणे हा त्यांचा मूळ पिंड आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रात पक्षासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना  ओळखले जाते आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सचिव पदाची जबाबदारी दिल्या गेली ही गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना अतिशय आनंदाचा उत्सवाचा आजचा दिवस असून त्यांच्या नियुक्ती ने वणी विधानसभेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक त्यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव विविध माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिनंदन करत आहे.


शुभेच्छुक : संजय खाडे मित्र परिवार,वणी विधानसभा क्षेत्र 
Previous Post Next Post