सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मारेगाव तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते इफ्तेकार रजाक शेख यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केली. जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण व वणी विधानसभेचे माजी आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांचे मार्गदर्शनाखाली भाजपचे मारेगाव तालुका अध्यक्ष यांनी नवीन कार्यकारिणीला सुरुवात केली असून इफ्तेकार शेख यांची सर्वानुमते अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष पदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे,शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, महिला पदाधिकारी शालिनी दारुण्डे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व इतर मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते. नवनिर्वाचित अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष इफ्तेकार शेख यांच्या निवडीने तालुकास्तरावरून अभिनंदन सह पुढील वाटचालींच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कांसाठी काम करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू तसेंच अल्पसंख्याकांच्या केंद्र व राज्य योजनाबाबत समाजात प्रसार करणे. अशा महत्वपूर्ण संकल्पना घेऊन काम करणार असल्याचे इफ्तेकार शेख यांनी 'सह्याद्री चौफेर 'शी बोलताना सांगितले आहे.