श्री दत्तात्रय बापुराव सुरावार यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील श्री दत्तात्रय बापुराव सुरावार (जुनी स्टेट बँक जवळ, वणी) यांचे आज राहत्या घरी दि.10 रोज गुरूवारला पहाटे च्या 3 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते मनिष सुरावार यांचे वडील होते. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधाम मध्ये आज दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास अंतिम संस्कार पार पडणार आहे. श्री.दत्तात्रय सुरावार यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

"सह्याद्री चौफेर" न्यूज परिवार तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

Post a Comment

Previous Post Next Post