टॉप बातम्या

नवीन वर्षाच्या पर्वावर कोलाम समाजाच्या मूलभूत हक्कासाठी इंदिरा बोंदरे यांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : अन्नूपोड येथे 1जानेवारी 2025 पासून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी कोलाम चावडीत आमरण उपोषण सुरू केले असुन याबाबत नागपूर येथे जावून मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणविस उपमुख्यमंत्री ना अजित पवार, ना एकनाथ शिंदे आदिवासी विकास विभागाचे सचिव सहित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यसचिव सौ सुजाता सैनिक यांना निवेदाद्वारे महिती सादर करुन जिल्हाअधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी तथा एकत्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा तहसीलदार केळापूर वन परिक्षेत्र कार्यालय पांढरकवडा सहित वडकी पोलिस स्टेशन यांना माहिती दिलेली असल्याची माहिती इंदिरा बोंदरे यांच्या सोबत उपोषणाला बसलेले कृष्णा मडावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुढे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाने मुंजाला येथील गट क्र १०१/१/ ब ऐकून क्षेत्रफल १२१:३३ आर पैकी कोलाम समाजाच्या लोकांनी सन १९९० पूर्वी पासून शेतीसाठी अतिक्रमण केलेले असुन सन २०२४ /२५ च्या खरीप हंगामा पर्यंत सतत कब्जात आहे. यावर्षी वन विभागाकडून जमिनी निष्कासित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत कोलाम समाज्याच्या कब्जात असलेल्या प्रत्येकी २ हेक्टर ऐकून ७० एकर जमिनी वगळून वन विभागाने काम सुरू करावे तसेच अन्नू पोड ते धाई पोड मार्गे मुंजाला पर्यंत पक्का पोहच रस्ता बनविण्यात यावा, टेंभूर्णी घाट ते अन्नू पोड डांबरीकरन कऱण्यात यावे, कोलाम समाजाला स्वतंत्र दफन भूमी आरक्षित करुन देण्यात यावी, अन्नू पोड वरील बेघर लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा, कोलाम समाजाचा शिक्षक नियुक्त करण्यात यावा, अन्नू पोडावर स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटाकडे देण्यात यावा, अन्नू पोडावरील चावडीचे पुनर्विकास करण्यात यावा विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा अशा विविध समस्या घेवून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महीला अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे ह्या कोलाम समाजाच्या महीला पुरुषांना सोबत घेवून अन्नू पोड चावडीत नवीन वर्षाचे पर्वावर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. नवीन वर्षाच्या पर्वावर लोक आनंद व्यक्त करतांना दिसतात परंतू कोलाम समाज हा आपल्या मूलभूत अधिकार करिता नवीन वर्षाच्या सुरवातीला संघर्ष करीत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सौ. बोंदरे यांनी केला असुन राळेगाव मतदार संघाचे आमदार तथा आदिवासी मंत्री प्रा. अशोक उईक उपोषण कर्त्याची भेट घेणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण बेमुदत सुरू राहणार असल्याचं उपोषण कर्ते कृष्णा मडावी, केशव वडदे, चंडकु कडकी, वसंता रामपूरे, अंबादास टेकाम, अविनाश जांभूळकर, मारोती रामपुरे, वामन रामपुरे, किसन रामपुरे, अर्चना अत्राम मनोहर वडदे चंद्रकला रामपुरे गंगाराम अत्राम रामकृष्ण मडावी, विलास खडसे सहित अन्नूपोड वरील महिला पुरुषांनी संकल्प घेतला आहे. 

या नवीन वर्षाच्या पर्वावर सुरू झालेल्या कोलाम समाजाच्या आमरण उपोषणाची आदिवासी मंत्री तथा राळेगाव मतदार संघाचे आमदार प्रा. अशोक उईके कशी दखल घेतात याकडे कोलाम समाजाचे लक्ष लागलेले आहे. 

      
Previous Post Next Post