टॉप बातम्या

उंबरकरांचे वाढतंय बळ: मातंग समाजाचा मनसेला पाठींबा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात उतरल्या असून आपला जाहीर पाठिंबा दर्शवित आहे . हे समाज मनसे सोबत निवडणुकीत सहभागी होत असून राजू उंबरकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आज वणी विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या वरिष्ठ मंडळींनी उंबरकर यांची भेट घेऊन समाजाचा संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. 

वणी येथील स्थानिक मनसे कार्यालयात हरीश पोटफोडे, शैलेंद्र खडसे, नरेश ससाने, महादेवराव जाधव, सागर डोंगरे, रमण खडसे, अशोक पोटफोडे, सचिन शेंडे, केतन तायवडे, आकाश पोटफोडे, रमेश बावणे, विनयकुमार उकुंडे, रमेश राऊत, अनिकेत वानखेडे यांच्या सह अन्य समाज बांधवांनी राजू उंबरकर यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला.
Previous Post Next Post