सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : अपक्ष उमेदवार संजय रामचंद्र खाडे हे "डोअर टू डोअर" जाऊन मतदारांशी संवाद साधत आहे. त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहे. खाडे यांना वणी मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे 'शिट्टी' ची हवाच नाही तर विजयाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचा आशावाद समर्थकातून व्यक्त केल्या जात आहे.
वणी,झरी सह मारेगाव तालुक्यात लाट तयार झाल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. नांदेकर ठाकरे मिळून मतदारांना आपला खाडेंची शिट्टी कशी सरस यांची पुरेपूर खात्री मतदारांना आता पटत आहे. विशेष म्हणजे,संजय खाडे हे शेतकरी पुत्र असल्याने त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे. थेट बांधावर जाऊन बळीराजाशी संवाद साधत आहे. पंचवीस ते तीस वर्षाच्या राजकारणात त्यांनी अनेक चढाव उतार पहिले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी, शेतमजूर, विद्यार्थ्यांसाठी, किंबहुना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच माझी उमेदवारी आहे असे आवर्जून सांगतात.
आज गुरुवारी बोटोनी सर्कल मध्ये आपल्या प्रचार ताफ्यासह संजय खाडे, प्रथम नरसाळा त्यानंतर जळका येथील कलावतीबाई बांदूरकर यांना भेटून आशीर्वाद घेतला. त्याच क्षणी कलावतीबाई म्हणाल्या,आता आमदार संजय खाडेच पाहिजे, पंजा आला पाहिजेत. हे उदगार ऐकताच कार्यकर्त्यामध्ये आणखीनच उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी संजय खाडे यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी मी गावागावामध्ये जोमाने शिट्टी चा प्रचार करणार असेही त्या म्हणाल्या.आज गुरुवारी संजय खाडे यांचा जळका येथे प्रचार दौरा झाला. यावेळी कलावती यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.
कलावती बांदूरकर यांचा परिचय :
कलावती बांदूरकर या जळका येथील रहिवासी आहेत. 2008 साली त्यांच्या पतीने दुष्काळामुळे आत्महत्या केली होती. राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान खैरगाव, खंडणी, बोटोणी, वागदरा, हटवांजरी, जळका, सराटी, बुरांडा, आवळगाव, मेंडणी येथे प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात त्यांनी शेतक-यांच्या बांधावर जात शेतक-यांशी संवाद साधला. संध्याकाळी मारेगाव येथे प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत संजय खाडे यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला.
विदर्भ राज्य आघाडी चा पाठिंबा
विदर्भ राज्य आघाडी तर्फे संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष ऍड नीरज खांदेवाल यांनी पत्रक काढत खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. तर शिवस्वराज्य मंच राज्यभिषेक सोहळा समितीतर्फे पत्रक काढत संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.
कलावती म्हणाल्या आमदार संजू खाडेच पाहिजे, कलावती बांदूरकर यांचा पाठिंबा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 14, 2024
Rating: