विकासाची गंगा...संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार शिगेला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक बंडखोर आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे.
वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा उभे असणारे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराची मोट बांधली होती. 
वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवाळीमुळे मंदावलेला प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. शेकडो कोटींची विकासकामे, रखडलेली प्रकल्प पूर्ण केले. मतदार संघांचे चित्र पालटले. त्यामुळे 'विकासाची गंगा' घरोघरी, मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
आज शनिवारी सकाळीपासून शहरात तर ग्रामीण परिसरात प्रचाराचा ताफा पाहायला मिळाला. विकासाकामाला प्राधान्य देत मतदार संघात संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार झंजावत सुरू आहेत.


Previous Post Next Post