सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
हिंगणघाट : सात दिवस लोटूनही प्रशासनाने निराधार, आधारवाड हरवलेल्या नागरिकांच्या बेमुदत धरणे आंदोलनाकडे पाठविल्याचा संताप आता सर्वसामान्यातून उमटू लागला आहे. ह्या आंदोलनास तालुक्यातील विविध राजकीय संघटनेचा पाठिंबा मिळत असल्याचा ओघ वाढत आहे. हे विशेष..
जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या मंगला ठक यांच्या नेतृत्वात दिनांक 10 सप्टेंबर 2024 पासून तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहेत. सात दिवस लोटूनही प्रशासनाने साधी दखल घेतली नसल्याने सर्वसामान्यातून रोष व्यक्त होत आहे. आज सोमवारी राष्ट्रवादी चे अतुल वंदिले यांनी आंदोलन मंडपी भेट दिली. तसेच राष्ट्रवादीच्या, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा भेट दिली. तसेच मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी देखील भेट देऊन धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळे या आंदोलनास आणखीनच बळ मिळालं आहेत. तर विदर्भाचे प्रसिद्ध गायक सुरेंद्र डोंगरे यांनी सुद्धा मंगला ठक यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन चर्चा केली आहे.
विशेष म्हणजे आंदोलन कर्त्यांच्या मागण्या रास्त असून प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून जोर धरत आहे. आज आंदोलनाचा सातवा दिवस लोटूनही गेला मात्र, प्रशासन फिरकले नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मंगला ठक यांनी सांगितले. अजूनही या सरकारला जाग आली नसल्याचे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून "जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील" असा ठाम निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला आहे.
तालुक्यातील गाव खेड्यातून महिला पुरुष जेष्ठ नागरिक या धरणे आंदोलनात दिवासेंदिवस मोठ्या संख्येने सहभागी होत असून जर नमूद प्रश्न मार्गी लागल्या नाहीत हेच आंदोलन उग्र रुप धारण करून शासन प्रशासनाची अडचण वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलल्या जात असून संबंधितानी आंदोलन कर्त्यांच्या मागण्या कराव्यात अशी चर्चा आता जनतेतून उठत आहे.