सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14/09/2024 रोजी सांयकाळी 7 ते दि.15/09/2024 रोजी सकाळी 6 वाजताचे दरम्यान फिर्यादी नामे नामदेव दादाजी लांडे (वय 50) रा. कृष्णापुर यांचे शेतामध्ये बांधलेले दोन बैल कि.अं 1,20,000/ रु ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली आहे, अशी फिर्याद त्यांनी दिनांक 15/9/2024 चे सकाळी 10 वाजता पो.स्टे.ला दिली. फिर्यादीचे तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे व ठाणेदार माधव शिंदे यांनी बिट अंमलदार सह भेट देवुन कृष्णापुर येथील गावक-यांना रात्रीच्या वेळी गावात बाहेर गावाचे लोक आले होते का? याबाबत तपास करतांना काही बाहेर गावचे लोक आले असल्याबाबत माहीती मिळाली. त्यावरुन नमुद संशयिताबाबत तांत्रिक तपास केला असता नमुद गुन्ह्याच्या तपासात संशयित आरोपी नामे भोलाराम सुरेश पडोळे (वय 33) रा. डोर्ली (ता.वणी) याला तत्काळ अटक केले असता त्याने व ईतर 2 संशयित आरोपीनी बैलजोडी चोरल्याची कबुली दिली तसेच नमुद बैलजोडी त्याचे पिकअप वाहनाने भंडारा येथे नेले बाबतचे कबुली दिली. त्यावरुन रातोरात भंडारा येथे पोलीस पथक पाठवुन नमुदची बैलजोडी हस्तगत करण्यात आली. नमुद चोरी गेलेली बैल जोडी किंमत अंदाजे 1,20,000/-रु. व पिक अप वाहन किंमत अंदाजे 3,00,000/-रु. चा असा एकुण 4,20.000/-रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद अटक आरोपी व ईतर संशयित आरोपी विरुध्द पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे शिरपुर पोउपनि रावसाहेब बुधवत, पोहवा गंगाधर घोडाम, नापोकॉ गजानन सावसाकडे, चालक पोकॉ विजय फुल्लुके यांनी पार पाडली आहे.