सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कोसारा येथील रविंद्र वासुदेव खाडे (वय ४२) यांचे आज नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या अशा अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ते मागील २४ दिवसापासून नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल ला उपचार घेत होते.त्यांना जीबीएस नावाच्या आजाराने ग्रासले होते. त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान त्यांचे आज सकाळी आठ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.
रवींद्र हे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत ते २०१३ पासून शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यांनी सन २००७ मध्ये कोसारा ग्रामपंचायत लढवून सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. रविंद्र यांचे पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
आज दुपारी कोसारा येथील स्मशानभूमीत त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.