सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना ही योजना तळागळातील महिला पर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे.
योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी यासाठी महिला व बालकल्याण विभागाने शासन निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यातील तालुका स्तरीय समिती मधील अध्यक्ष व दोन शासकीय सदस्याची निवड करण्यात आली. यामध्ये विशाल किन्हेकर यांचा समावेश आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
संदर्भीय शासन निर्णयानुसार, सदर योजनेच्या तालुका स्तरावरील देखरेख व सनियंत्रणासाठी, तालुकास्तरीय समितीमध्ये श्री. विशाल किन्हेकर यांची मारेगाव तालुका अशासकिय सदस्य म्हणून निवड करण्यात आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या अशासकीयपदी विशाल किन्हेकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2024
Rating: