विजय बोथले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज शहरात काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बैठकीत सर्वानुमते काँग्रेस कमिटी च्या तालुका उपाध्यक्षपदी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात व काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पाटिल ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय बोथले यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विजय महादेव बोथले (कुंभा) यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून, पक्षात ते गेली पंधरा वर्षापासून सक्रिय व प्रामाणिकपणे काम करत असल्याने काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे व जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी त्यांच्या पक्षातील कामाची दखल घेत मारेगाव तालुका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
यावेळी पद निवडीला उत्तर म्हणून, आपण रात्रंदिवस मेहनत करून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करून पक्षाची सर्वधर्म समभाव ही भावना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे यावेळी बोलताना विजय बोथले यांनी सांगितले. 
ते या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावर, बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर, माजी सरपंच विजय घोटेकर, माजी पंचायत समिती सदस्य गजानन खापणे सह आदींना दिले.



विजय बोथले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड विजय बोथले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.