दीपक चौपाटी परिसरात गॅरेज'ला भीषण आग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील चौपाटी परिसरातील 'किंग स्कुटर' गॅरेज'ला अचानक आग लागली, ही घटना काल मंगळवारी (ता. 30) ला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली असून यात लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
शहरातील दीपक चौपाटी परिसरात किंग स्कुटरचे मोटारसायकल दुरुस्ती गॅरेजचे दुकान होते. त्या गॅरेज ला अचानक आग लागली. आगीने पुर्ण दुकानाला कवेत घेत पाहता पाहता रौद्र रूप धारण केले होते. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले असुन संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
दरम्यान,नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप तरी अस्पष्ट असून या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

रंगनाथ स्वामी मंदिर जवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती.

Previous Post Next Post