राष्ट्रीय सैनिक संस्था वणी तालुका द्वारा वृक्षारोपण करून कारगिल शहीद वीरांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : २६ जुलै २०२४ रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) व महासचिव हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनात अमरावती विभागीय उपाध्यक्ष मुस्कान सैय्यद यांच्या नेतृत्त्वात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून येथील माजी शासकीय शाळेत मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करून कारगिल युद्धात शहीद वीरांना अभिवादन करण्यात आले.
कारगिलचा विजय ही भारताच्या इतिहासात सुवर्णा अक्षरांनी लिहिलेली कामगिरी आहे. यासाठी अनेक जवानांनी बलिदान दिले असून त्या सर्व शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी माजी शासकीय शाळेचे मा. प्राचार्य मुजफ्फर खान सर व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सैनिक संस्था वाणी तालुकाध्यक्ष गणेश बुरंडे, साहिल लोखंडे, सुमित जुमनाके, ईशा जुनगरी, वैभव मडावी, श्रुती बोंडे, दुर्गा डाखरे, वितेश वंजारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सैनिक संस्था वणी तालुका द्वारा वृक्षारोपण करून कारगिल शहीद वीरांना अभिवादन राष्ट्रीय सैनिक संस्था वणी तालुका द्वारा वृक्षारोपण करून कारगिल शहीद वीरांना अभिवादन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.