सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. अशातच नेते,पुढारी,आजी- माजी सर्वच विधानसभा मतदार संघात दौरे करतांना नजरेस पडत आहे. यावेळी वणी विधानसभा कोणता पक्ष,उमेदवार जागा जिंकतो याबाबत अजून पर्यंत कोणीही दावा केलेला नाही. मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, त्याला जनता एक्सेप्ट उचलून धरू शकते अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे.
वणी मतदार संघात कोण्या एका पक्षाला जनाधार नसुन या संघात जनता प्रामाणिक काम करणाऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. परंतु दावेदारीच्या समीकरणात तालुक्यात जाणीवपूर्वक तेच ते उमेदवार लादून जागा सोडली जात नाही. असा आरोप राजकीय वर्तुळात देखील होत आहे.
नेत्यांकडून जाणीवपूर्वक गट-तट, स्वयम प्रतिष्ठा जोपसण्यात पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले जात असल्याची बोंब कार्यकर्त्यातून नेहमीच असताना पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार खासदार जरी पक्ष सोडून इकडे तिकडे गुलाट्या मारत असले तरी मतदार मात्र, आज प्रामाणिक आणि कर्त्या माणसाच्या सोबत आहे. वणी विधानसभा अनेक जन लढवण्यास इच्छुक आहे, यात ते आपला विजय निश्चित आहे. अशी आशा मनी बाळगून आतापासूनच ते कामाला लागले आहे. वणी मतदार संघातील मतदारांच्या भावनेचा आदर कोण राखतं किंबहुना विविध पक्षाची वणी विधानसभेची उमेदवारी कोणाच्या पत्यावर पोहचते हे अजून तरी निश्चित नाही.
त्याचबरोबर ओल्ड नेत्यांनी जर सन्मानाने वणीची जागा सोडत नसेल तर आपण किती दिवस फरफट सहन करायची स्थानिक स्वराज्य संस्थेपासुन लोकसभेपर्यंत जिल्ह्यात असलेल्या प्रत्येकाच्या जनधरामुळे किमान ज्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन वणी मतदार संघाला न्याय दिला पाहिजे, परंतु जागा वाटपात किंवा निवडणुकी नंतर मात्र, चांगल्या व्यक्तिमत्वाला कुठेही विचारात घेतले जात नाही. असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळे सन्मानाने वणी विधानसभेची जागा नवनिर्वाचित लोकांना न सोडल्यास हेच ईच्छुक उमेदवार स्वतंत्र लढले पाहिजे. जनता त्यांच्या सोबत असुन वणी विधानसभेत त्यांचा विजय कोणीही रोखु शकत नाही. असे वातावरण वणी, मारेगाव, झरी तालुक्यात निर्माण झाले असल्याची चर्चा आहे.
वणी मतदार संघात अनेकजन लढवण्यास इच्छुक..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 20, 2024
Rating: