विजय चोरडिया यांनी खोब्रागडे कुटुंबीयांचे भेट घेऊन केले सांत्वन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : इमारतीला रंगकाम करताना बंडू तुकाराम खोब्रागडे (50) रा. रंगारी पुरा, वणी यांचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते मजुरीने रंगकाम काम करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ते आपल्या कुटुंबाचे आधारवड होते. मात्र, अचानक बंडू यांचे अकस्मात निधन झाल्याने खोब्रागडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांना त्यांच्या मित्र परिवारांनी दिली,
लगेच चोरडिया यांनी आज सोमवार 29 जुलै ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खोब्रागडे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. व त्यांना आर्थिक मदत म्हणून 31 हजार रुपये रोख रक्कम परिवारास भेट दिली. तसेच त्यांनी यापुढे कोणतीही मदत लागल्यास मदत करणार असल्याचे खोब्रागडे कुटुंबीयांना सांगितले. यावेळी खोब्रागडे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते, यावेळी राजू धावंजेवार प्रदेशाध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा परिषद, विशाल दुधबडे संयोजक विश्व हिंदू परिषद, सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार, अशोक सिंग, संदीप बेसरकर बाळासाहेब खैरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
विजय चोरडिया यांनी खोब्रागडे कुटुंबीयांचे भेट घेऊन केले सांत्वन विजय चोरडिया यांनी खोब्रागडे कुटुंबीयांचे भेट घेऊन केले सांत्वन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.