सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती मारेगावच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत वैशिष्ट्यपुर्ण गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सन २०२३-२४ या सत्रात १० वीच्या परिक्षेत ८० टक्के व १२ वी च्या परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट राहणार असुन, उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑ.बँक संचालक विजय चोरडीया करणार आहे.
उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार उत्तम निलावाड, ठाणेदार शंकर पांचाळ,गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर,क्रुषी अधिकारी संदिप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी अरुण भगत, गटशिक्षणाधिकारी स्नेहदिप काटकर, महावितरण अभियंते शैलैंद्रकुमार पाटील,एकात्मीक महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर, सेंट्रल बँक व्यवस्थापक आरीफ शेख, मार्गदर्शन करणार आहे. विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त दुग्ध विकास विभाग कार्यालय अधिक्षक श्रीराम कुमरे तर स्वागताध्यक्ष म्हणून अ.भा.सं प. सचिव सुरेश लांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच तुळशिराम कुमरे,बांधकाम सभापती अंजुम शेख उपस्थीत राहणार आहे.
३१ जुलै बुधवार ला, आयोजीत या सन्मान सोहळ्यात वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक,व पदाधिकारी यांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी,पोलीस पाटील, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाज सेवक, यासह अनेकांचा समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक, तथा उपस्थीतासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजीत कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रतिभा तातेड यांनी केले आहे.
मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2024
Rating: