सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील दापोरा शिवारातील उपाश्या नाला ओलांडून जाताना एका शेतकऱ्याचा पाण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. मेघश्याम नारायण वासाडे रा. चिंचमंडळ (वय 58) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज सोमवारला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडल्याने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.
तालुक्यात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरु असतांना सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून पूर वाहत आहे. अशातच मेघश्याम वासाडे हे आपले पशुधन घेवून शेतात जात होते. दापोरा समोरील उपाश्या पुलावरून शिवपांदन रस्त्याने शेतात जात असताना पाणी ओलांडून पशुधन घेवून ते पाण्यात बुडाले अशी माहिती मिळताच तहसीलदार उत्तम निलावाड व त्यांची टीम तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नाल्याच्या पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेतला घटनास्थळीच तो इसम मृतावस्थेत सापडला.
गावाशेजारील माणूस पाण्यात बुडाल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शेतकरी अखेर सापडला अशी तूर्तास माहिती आहे. मात्र, पावसात अशावेळी नागरिकांनी पूर असलेले पुल, नदी नाले ओलांडून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार उत्तर निलावाड यांनी यावेळी केले आहे.
चिंचमंडळ येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2024
Rating: