सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. येथील नागरिकांना नमूद रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच नवीन अग्रवाल यांनी हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा संबंधित विभागाकडे २६ जुलै रोजी केला होता. त्यामुळे सदर रस्त्यावर करावी लागणारी तारेवरची कसरत आणि स्थानिकांना होणारा नाहक त्रास, ही बाब लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागा (PWD) ने आज (२८) पासून केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आणि सदर लांबी जुलै २०२४ च्या अर्थ संकल्पामध्ये मंजूर असून सदर काम निविदा स्तरावर आहे. व येत्या २० दिवसात नवीन कामाला सुरुवात होईल, त्यामुळे उदयाचे चक्का जाम आंदोलन स्थगित करावे असे पत्र वेळाबाई/मोहदा ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे. सरपंचा सौ.रंजना बांदूरकर (वेळाबाई), सरपंचा सौ.वर्षां राजूरकर (मोहदा) यांच्या सह गावाकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.
सतत दुर्लक्ष करणाऱ्या विभागाला अखेर जाग आली असून आज रोजी कामाला सुरुवात झालेली आहे. याबाबत समाधान आहे, येजा करणाऱ्याकडूनही दिलासा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या सोमवार (ता.२९) रोजी नियोजित "चक्काजाम आंदोलन" तूर्तास स्थगित करण्यात येत आहे, असे मोहदा येथील स्टोन क्रेशर धारक नवीन अग्रवाल वर उपसरपंच सचिन रासेकर यांनी सांगितले. आमची समस्या प्रशासन दरबारी पोहचवली यासाठी 'सह्याद्री चौफेर'चे वर प्रशासनाचे आभार...
चक्काजाम आंदोलन तूर्तास मागे, रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2024
Rating: