सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील शासकिय विश्रामगृहात रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी आदिवासी समाजाचे सामाजिक व राजकिय अस्तित्व निर्माण करण्यासाठी तसेच वणी शहरातील आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाज बांधवांकडून उपाययोजना जाणून घेण्यासाठी जाहिर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रात महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. संतोष भादिकर, राष्ट्रीय संघटक संतोष चांदेकर, यवतमाळ जिल्हा प्रचारक महेश आत्राम, वणी तालुका अध्यक्ष प्रदीप जुमनाके, वणी शहर अध्यक्ष रमेश मडावी, रानु तुमराम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या चर्चासत्रात वणी शहरातील आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येकांनी आपले मौलिक विचार मांडले. लवकरच वणी शहरातील आदिवासींचा प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शैक्षणिक विकास जाणून घेण्यासाठी व समतोल शैक्षणिक विकास साधण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक मानसिकता, उच्च शिक्षणाप्रती आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, वणी शहरातील आदिवासी समाजाचा कसा सकारात्मक उपयोग करून घेता येवू शकतो. याकरीता वणी शहर आदिवासी शिक्षण परिषदचे आयोजन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे आघाडी च्या वतीने सांगण्यात आले. तसेच वणी शहर आदिवासी समाजामध्ये सर्व अनुसूचित जमातीचे एकत्रीकरण घडवून आणण्यासाठी सर्व आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्रित येवून आदिवासींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वणी शहरात "आदिवासी दबावगट" निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी प्रामुख्याने कॉंग्रेसचे महाराष्ट्र आदिवासी सेलचे महासचिव श्री. उत्तमराव गेडाम, सोशल फोरमचे उपाध्यक्ष श्री. रामदास गेडाम, सोशल फोरमचे सचिव श्री.श्रीकृष्ण मडावी, सोशल फोरमचे सहसचिव श्री. भगवान आत्राम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे वणी तालुका अध्यक्ष व वसंत जिनींगचे संचालक श्री. अशोक नागभिडकर, श्री. सुभाष चांदेकर, श्री.बंन्शी सिडाम साहेब, श्री.लिलाधर आरमोरीकर (गोंडी साहित्यिक व विक्रेता) इत्यादी उपस्थित होते.
चर्चासत्राचे सूत्रसंचालन अॅड. संतोष भादिकर यांनी व आभार प्रदर्शन संतोष चांदेकर यांनी केले.
वणीत महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे चर्चा सत्र
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 22, 2024
Rating: