तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : इमारतीचे पेंटिंगचे काम करत असताना तोल जाऊन वरून खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 
बंडू तुकाराम खोब्रागडे (वय 50) रा. रंगारीपुरा असे या रंग रंगोटी काम करणाऱ्या कामगाराचे नाव असून या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बंडू हे शहरातील छोरीया ले-आऊट मधील इमारतीला रंगरंगोटी चे काम करत असतांना त्याचा बॅलन्स डगमगल्याने ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यारून चक्क! खाली आदळले. यात बंडू खोब्रागडे याला जबर मार लागून डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान,त्याच्या कामगार सहकाऱ्यानी त्याला ताबडतोब वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर बंडू खोब्रागडे यांच्या परिवाराला ही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला. 



तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on July 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.