आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे- बाबारावजी मडावी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : आदिवासींचे संविधानावरील आरक्षणाची बोगस लुटमार करीत असुनही विविध पक्ष आदिवासीवर होणारा अन्याय दुर करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत. आदिवासीचे शोषण आणि त्यांचेवर लादलेली गुलामी आदिवासींना त्यांचे हक्क आणि विकासापासुन वंचीत करणारी आहे.अश्या अवस्थेत सर्व आदिवासींनी आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाचे झेंडे ऊभारावे. 
आदिवासी अनेक गटातटात,वेगवेगळ्या संघटनेत, पक्षात आणि जमातवादात विभागल्या जात असुन आदिवासीची विभागणी प्रगतीच्या आड येत आहे. अश्या अवस्थेत आदिवासींनी संघटीत होवुन आपल्या अस्तित्वाच्या राजकारणाची सुरवात करावी. लोकशाहीत जागे झालेली माणसेच शाबुत राहू शकतात, याचे भान ठेवुन आदिवासींनी अस्तित्व तथा अस्मितेचे राजकारण करण्यास सज्ज व्हावे,असे आवाहन आदिवासी साहित्यिक वर प्रगतशील विचारवंत बाबारावजी मडावी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे- बाबारावजी मडावी आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे- बाबारावजी मडावी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.