लाडक्या बहिनींसाठी मारेगावात सहाय्यता कक्ष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनांचा लाभ घेण्यासाठी शहरासह तालुक्यातील महिलांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्म भरून देण्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप कार्यालयात सहाय्यता कक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लाभार्थी महिला यांच्या फार्म नोंदणी संदर्भात लाभार्थी महिला यांच्या अडचणी लक्षात घेऊन सदर व योजनेचा लाभ लाभार्थी महिला यांना मिळेल याची दक्षता घेऊन सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 
वणी-मारेगाव रोडवरील पोस्ट ऑफिस ला लागूनच असलेल्या भाजपा कार्यालयात मोफत नोंदणी सहायता कक्ष उघडण्यात आले, सदर कार्यक्रम दिनांक 19 जुलै पासून राबविण्यात येत असून विहित मुदती पर्यंत कक्ष सुरू राहणार आहे. या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा असे, आवाहन वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

शुभारंभाच्या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अनुप महाकुलकर, सौ. शालिनीताई दारुंडे, डोमाजी भादीकर, मारोती तुराणकर, पवन ढवस, प्रसाद झाडे, प्रवीण बोथले, नगरसेवक राहुल राठोड, सुनील देवाळकर,आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.
लाडक्या बहिनींसाठी मारेगावात सहाय्यता कक्ष लाडक्या बहिनींसाठी मारेगावात सहाय्यता कक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.