टॉप बातम्या

'बार'मध्ये युवकांची फिल्मी स्टाईल "फायटिंग"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील अगदी लोकवस्तीत असलेल्या "आशा बार" मध्ये दारू पिण्याकरिता आलेल्या तरुणांच्या गटबाजीत तुफान हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून काही मद्यपिंना ताब्यात घेत त्यांचे वर गुन्हा दाखल केला आहे.

बार मध्ये घडलेल्या या घटनेत दरम्यान,एकमेकांना प्रचंड मारहाण करतांनाच त्यांनी एकमेकांवर काचेचे ग्लास भिरकावले. काचेचा ग्लास लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याच्या मित्रानी त्याला रुग्णालयात दाखल केले. हा 'धिंगाणा' नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. परंतु या धांगडधिंगाण्याला जुन्या वादाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे. बियरबारमध्ये युवकांची फिल्मी स्टाईल सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. परंतु दोन्ही गटातील तरुण आपल्याच तोऱ्यात होते. ते पोलिसांना काही एक सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत काही तरुणांवर गुन्हे दाखल केले आहे. वणी-वरोरा मार्गांवरून गौरकार कॉलनी कडे जाणाऱ्या आशा बियर बार मध्ये झालेला हा धिंगाणा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

कधी काळी शांत असलेल्या या वणी शहरात आता भाईगिरी वाढली आहे. एकमेकांवर जोर आजमावण्याकरिता आपल्या सहकारी मित्रांना बोलावून राडे करण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. कधी प्रकरणं पोलिस स्टेशनपर्यंत येतात. तर कधी आपापसातच मिटविले जातात. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास तरुणांचे ही गँगवार शहरातील शांतता भंग केल्याशिवाय राहणार नाही. परिणामी लोकवस्ती मध्ये असलेल्या या 'बार' च्या अधून मधून विविध तक्रारीने डोकं वर काढत असल्याने नागरिकात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. 
Previous Post Next Post