सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते.
"12 मे" हा मातृ दिवस हा जगभर साजरा होत असताना वणी येथेही मातृदिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने किंबहुना सांस्कृतिक क्षेत्रात सतत पुढाकार घेत असलेल्या सागर झेप बहुउद्देशीय संस्थेतर्फे जैताई मंदिर येथे मातृदिनानिमित्त स्त्रियांकरिता फॅन्सी ड्रेस, नृत्य व इतर खेळ घेण्यात आले. खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यात उखाणे स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सर्व महिलांनी दर्जेदार उखाणे घेतले. काही महिलांनी व मुलींनी नृत्य सादर केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये महिलांनी विविध संगीतावर उत्कृष्ट सादरीकरण केले.
या स्पर्धेत पैठणी विजेती प्रथम क्रमांक श्रद्धा नक्षिणे, द्वितीय क्रमांक प्रविना कामडे, तृतीय क्रमांक सोनाली समर्थ, प्रोत्साहन पल्लवी बासमवार, प्रिया कोणप्रतीवार यांना प्राप्त झाले. या कार्यक्रमात जेष्ठ नाट्य कलावंत अशोकराव सोनटक्के यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी स्पर्धाकांना कौतुकासह शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन स्पृहा कोरडे, भाविका श्रीवास्तव, तपस्या बरडे यांनी केले. विशेष म्हणजे "मातृ दिन" साजरा करण्याची संकल्पना सागर मुने यांची असून सुमन डेकोरेशन चे संचालक संदीप आस्वले व जैताई देवस्थानचे सहकार्य लाभले.