सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : येथून सात किमी अंतरावर असलेल्या नवरगाव (धरण) येथे एका 35 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.
उमेश अशोक नक्षिणे (३५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने नवरगाव येथील पीठगिरणीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीच्या सहाय्याने आज सोमवार (29) ला दुपारी अंदाजे 2 वाजता चे दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली.
त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृतक उमेश याच्या पाठीमागे पत्नी आई एक मुलगा एक मुलगी व मोठा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून ही मालिका थांबता थांबेना. मागील आठवड्यात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज आत्महत्या ची घटना समोर आल्याने प्रशासनाने तालुक्यात आत्महत्यासारख्या गंभीर विषय रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
35 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 29, 2024
Rating: