सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणूक मैदानात भाजपा कडून उमेदवार कोण? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली असताना आज 13 मार्चला भाजपने उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे नाव फायनल झाले आहे.
चंद्रपूर-आर्णी लोकसभा उमेदवारीच्या शर्यती मध्ये माजी खा.हंसराजभैय्या अहिर तर दुसरे ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावावर जोरदार रस्सीखेच झाली. मात्र, भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्याना संधी देत आपला हुकमी एक्का ओपन केला आहे. यंदाच्या लोकसभेला नवा चेहरा मिळेल अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यां मधून व्यक्त होत असताना ना.मुनगंटीवार हेच भाजपाकडून प्रबळ दावेदार ठरले आहे.
मागील निवडणुकीत माजी खा.हंसराजभैय्या अहिर यांना मोदीजीच्या लाटेतही पराभवाचा सामना करावा लागला होता.त्यामुळे यंदाच्या निवडणूकित या जागेचे नुकसान पक्षाला महागात पडेल म्हणून नवा चेहरा आ.सुधीरभाऊ मुंनगंटीवार याच्या रूपाने देण्यात आला आहे.त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.सध्या त्यांना शह देणारा वोरोधी पक्षात तुल्यबळ उमेदवार अजून पर्यंत जाहीर झालेला नाही. कांग्रेस पक्षात उमेदवारीवरून दोन महिलां प्रमुख नेत्यां मध्ये घामासान होताना दिसून येत आहे. त्यामुळे कुरखेडीचा पुरेपूर फायदा मुंनगंटीवार हे उचलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
वणी विधानसभा मतदार संघांचे कर्तव्यदक्ष आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मोठया प्रमाणात वाढविलेला जनसपंर्क भाजपासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात इंनकमिंग सुरु आहे. हा फायदा पक्षाला होणार आहे. ना.श्री.मुनगंटीवार यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात..!
1. चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
2. रावेर - रक्षा खडसे
3. जालना- रावसाहेब दानवे
4. बीड - पंकजा मुंडे
5. पुणे- मुरलीधर मोहोळ
6. सांगली - संजयकाका पाटील
7. माढा- रणजीत निंबाळकर
8. धुळे - सुभाष भामरे
9. उत्तर मुंबई- पियुष गोयल
10. उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
11. नांदेड- प्रतापराव चिखलीकर
12. अहमदनगर- सुजय विखे पाटील
13. लातूर- सुधाकर श्रृंगारे
14. जळगाव- स्मिता वाघ
15. दिंडोरी- भारती पवार
16. भिवंडी- कपिल पाटील
17. वर्धा - रामदास तडस
18. नागपूर- नितीन गडकरी
19. अकोला- अनुप धोत्रे
20. नंदुरबार- डॉ. हिना गावित