सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रकल्प ग्रस्त्त महिलांचा 12 मार्चला दिंदोडा धरणावर मोर्चा काढण्यात आला होता.
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे निवेदन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांचे कडे देण्यात आले. दिंदोडा प्रकल्प ग्रस्तावर झालेल्या अन्याया विरोधात हा महिला मोर्चा तालुक्यातील सावंगी (संगम) येथे काढण्यात आला होता.
प्रकल्प ग्रस्ताना वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नारी शक्तीनी पुढाकार घेत हे आंदोलन केले. आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी विलास भोंगाडे यांची उपस्थिती होती. या आंदोलनात प्रकल्प बाधित शेतकरी,शेतमजूर,मच्छिमार बांधवाचे सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा यशस्वीतेसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या महिलां सदस्यांनी प्रयत्न केले. अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित मांडेकर,सचिव चंपत साळवे यांनी वाढीव मोबदला दिल्या शिवाय प्रकल्पाचे बांधकाम करु नये, असा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
महिलां मोर्चाचे नेतृत्व सुजाता भोंगाडे,समीक्षा गणवीर यांनी केले. यशस्वीतेसाठी मंजुषा लडके,जयश्री पिसे,सविता खाडे,मायाताई भोयर,ज्योती भोयर,कल्पना काळे,विद्या तिजारे,शालू डहाके, सोनाली वरवाडे,शालू देवाडे यांनी केले, सूत्रसंचालन,मंगला ठाकरे यांनी केले.
समिती चे निवेदन स्विकारलेले आहे. आणि त्यांच्या जे काही मागण्या आहे त्या वरिष्ठाकडे सादर करण्यात येइल.-उत्तम निलावाडतहसीलदार मारेगाव
या अगोदर सुद्धा वरिष्ठाकडे आपण निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात शासनाच्या बैठका झालेल्या आहे आणि आज संघर्ष समितीने दिलेले त्यांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ स्तरावर देण्यात येइल.-प्रकाश गायकवाडकार्यकारी अभियंता