सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : नुकताच तलाठी भरती परिक्षेचा निकाल लागला.ह्या निकालात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. टि.सी.एस. (TCS) व आय.बी.पी.एस. (IBPS) मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात विविध पदाच्या परिक्षा घेण्यात येत आहे. शासनाने या परिक्षा घेणार्या कंपनीची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावे व तसेच भरती संदर्भात विविध मागण्या घेऊन हजारो विद्यार्थी 11 जानेवारी रोजी तहसिल कार्यालयावर धडक देत उपविभागीय कार्यालय वणी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून मागणी केली.
राज्यात स्पर्धा परिक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पध्दतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या, स्पर्धा परिक्षा घेण्याची जवाबदारी टि.सी.एस. व आय.बी.पी.एस कडून सरकारने काढून घ्यावी तसेच सरळसेवा,स्पर्धा परिक्षा एम.पी.एस.सी (MPSC) मार्फत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, या विविध मागणीला घेऊन शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करित तहसील कार्यालयावर धडक दिली.