कोळसा कामगार व कंत्राटी मजुरांचे एक दिवशीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 11 जानेवारी 2024 रोजी भारतीय कोळसा खाण कामगार युनियन, वणी अंतर्गत वणी नॉर्थ विभाग व माजरी विभागाचे प्रादेशिक महाव्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर कोळसा कामगार व कंत्राटी मजुरांच्या मोठ्या उपस्थितीत निषेध निदर्शने करित निवेदन देण्यात आले.

ऑल इंडिया माइन लेबर युनियनच्या आवाहनावर कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी CMPF मधून 2014-15 मध्ये 1390 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यापैकी 727.67 कोटी रुपये माफ करण्यात आले. त्यामुळे सीएमपीएफ मधील डीएचएफएल गुंतवणूक घोटाळ्याची सीबीआय चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीकडून 727.67 कोटी रुपयांची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी, CMPF पूर्णपणे ऑनलाइन बनवा जेणेकरून सर्व कामगार त्यांचा भविष्य निर्वाह निधी पाहू शकतील, HPC उच्चाधिकार समिती अंतर्गत कंत्राटी मजुरांना पगार,नोकरी सुरक्षा,कामाचे 8 तास, सामाजिक सुरक्षा,बोनस,रिक्त कंपनी निवासस्थानाचे वाटप इत्यादी सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच CMPF आणि ग्रॅच्युइटी अदा करावी. व वेतन मंडळ 11 अंतर्गत सुधारित पेन्शनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

या सर्व मागण्यांच्या निषेधार्थ वणी नॉर्थ प्रदेशचे प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री प्रल्हाद जोशी, संसदीय कार्य मंत्री तथा कोळसा मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोल इंडियाच्या सर्व कंपन्यांच्या प्रादेशिक महाव्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली.

निवेदनावर भाकोखमसंघ वणी-माजरी जगन्नाथ गेणेकर, शंकर एडलवार, मंगेश अजिमरे, गुलाब चौधरी, गणेश चौधरी, यांच्या सह्याद्री आहेत. यावेळी वणी-माजरी क्षेत्रीय व उपक्षेत्रीय पदाधिकारी, कंत्राटी मजूर मोठ्या संख्येने उपस्थिती होते.