सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
या प्रसंगी पक्षाचे जेष्ठ नेते मंगेश देशपांडे, यांच्या व माजी सरपंच भास्करराव धानफुले सर यांच्या हस्ते नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देशपांडे यांनी पक्षातील अनुभव, भूमिका कथन करित असताना संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची राजकारणातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात ख्याती आहे, असे दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अविनाशजी लांबट. असे म्हणत नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश लांबट यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्षाचे नेते मंगेश देशपांडे, जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भास्करराव धानफुले सर, सुधाकरजी बोबडे गुरुजी, विजय खिरटकर, शेखर काळे, पंकज आंबूळकर, संदीप झोटिंग, बाळू चौधरी, शंकर इनामे,यांच्या सह मित्र परिवारांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर काळे यांनी केले, तर नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री लांबट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांना एकत्र घेऊन पक्ष बळकट करणार, अशी ग्वाही दिली.
नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 29, 2023
Rating: